पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड येथील नाशिक फाटा जवळ खाजगी ट्रॅव्हल्स ला भीषण आग लागली. सुदैवाने ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. सकाळी सातच्या सुमारास बसला आग लागली. शॉर्टसर्किट होऊन ट्रॅव्हल्स ला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. वल्लभनगर येथील अग्निशमन दलाने येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, निगडी येथून भोसरीच्या दिशेने जाणाऱ्या बसला भीषण आग लागली. सुदैवाने यात प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. ट्रॅव्हल्स मध्ये दोन चालक होते.पैकी, एक जण ट्रॅव्हलमध्ये झोपला होता. बसला आग लागल्यानंतर समोरील ट्रॅव्हल्स चालकाने प्रसंगावधान दाखवत त्याला बाहेर काढले.
हेही वाचा…पुणे : चांदणी चौक परिसरात अपघात; मालवाहू एसटी बसची सिमेंट मिक्सरला धडक
याबाबतची माहिती वल्लभनगर येथील अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमनच्या दोन वाहनांनी तातडीने येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. तोपर्यंत ट्रॅव्हलच्या पुढील भाग जळून खाक झाला होता. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन ने दिली आहे.
भूषण येवले (फायरमन),विशाल फडतरे (डी.सी.ओ),रुपेश जाधव (डी.सी.ओ),मयूर कुंभार (डी.सी.ओ), सिध्देश दरवेस(ट्रे.फायरमन),प्रतिकअहिरेकर,समीर पोटे, प्रतिक खांडगे,शुभम क्षीरसागर,अनिकेत गोडसे,संकेत भोसले,अक्षय झुरे या अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.