पिंपरी- चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्या शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने आठवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सार्थक कांबळे असं मृत्यू झालेल्या शालेय विद्यार्थ्याचे नाव आहे, अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे. हुतात्मा चापेकर विद्यामंदिर ही महानगरपालिकेची शाळा आहे. ही घटना दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पिंपरी : महापालिका शाळांतील मुलांसाठी २९ कोटींचे गणवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक कांबळे हा इतर मित्रांसह तिसऱ्या मजल्यावर थांबला होता. पायऱ्याजवळ असलेल्या लोखंडी ग्रीलवर आतील बाजूस पाय करून सार्थक बसला. त्याच्या मित्रांनी त्याला असं बसू नकोस, तू खाली पडशील असं म्हणताच तेवढ्यात सार्थक खाली पडला. गंभीर जखमी झालेल्या सार्थकला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad municipal corporation school 8 th class student died after falling from the third floor kjp 91 css