लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ या प्रमाणे पुण्याच्या शेजारी असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील नागरिक देखील अनेकदा रात्रीच्या वेळी उशिरा कोणी नाही, हे पाहून सर्रासपणे रस्त्याच्या बाजूला, वर्दळ नसलेल्या ठिकाणी तसेच मोकळ्या आणि दुर्लक्षित जागेवर कचरा टाकतात.

रस्त्याच्या कडेला कचरा टाकणारे हे नागरिक सुशिक्षित असून अशा पद्धतीने रस्त्यावर कचरा टाकला जाऊ नये, असे आवाहन करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. दोन आठवड्यांपूर्वी ‘लोकसत्ताने’ याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करत यावर आवाज उठविला होता. शहरातील अनेक भागांत नागरिकांकडून रस्त्यांवर हा कचरा गुपचूप टाकला जात असल्याचे आतापर्यंत केलेल्या पाहणीतून समोर आलेले आहे. यावर अनेक वाचकांनी ‘लोकसत्ता’कडे पत्रव्यवहार करून ही कचरा समस्या सोडविण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत भूमिका मांडली आहे.

आणखी वाचा-प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणीीची समाज माध्यमात बदनामी, कोथरुड पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

शहरातील विविध भागांतील कचरा हा घंटागाडीच्या माध्यमातून सकाळच्या वेळेत संकलित केला जातो. त्यामुळे रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी रस्त्याच्या कडेला तसेच मोकळ्या जागांवर तसेच रस्त्यावर फेकला जातो, ही वस्तुस्थिती आहे. ‘लोकसत्ता’ने या विषयाला प्राधान्य देत त्याबद्दल अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.

शहरातील विविध भागांत तयार होणारा कचरा हा घंटागाडीच्या माध्यमातून गोळा केला जातो. दररोज सकाळच्या वेळेत हा कचरा गोळा केला जातो. त्यामुळे पहाटे फिरायला बाहेर पडलेले नागरिक आपल्याबरोबर कचरा आणत तो जागा मिळेल अशा कोणत्याही ठिकाणी फेकतात. यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने रात्री नऊनंतर कचरा गोळा करणारी घंटागाडी सुरू केली पाहिजे. तसेच कोणाकडे काही कारणास्तव जास्त प्रमाणात कचरा असल्यास त्यासाठी पालिकेने वेगळी स्वतंत्र गाडी पाठवावी. याासाठी काही प्रमाणात शुल्क घेण्यास कोणाचीही हरकत नाही. वारंवार असे दिसून आलेले आहे की, महापालिकेच्या घंटागाडीचे कर्मचारी कचरा संकलन व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने करत नाही. तसेच अनेकदा कचरा गोळा करणाऱ्या गाडीमध्ये क्षमतेपेक्षा अधिकच भरला असतो.

आणखी वाचा-अशी झाली महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची सांगता..!

कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने याकडे गांभीर्याने पाहत काही भागांत संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेत कचरा गाडी पाठविली पाहिजे. गेले अनेक वर्षे हा प्रश्न सुटलेला नाही, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली पाहिजे. -जयदीप खरे, स्थानिक नागिरक

जनजागृती करण्यात प्रशासन अपयशी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतेच पुण्यात आणि मुंबईला केलेल्या फटाक्यांच्या विविध प्रकारांच्या आवाजाची मोजणी केली. ही आकडेवारी १२५ डेसिबल्सपेक्षा जास्त आहे. मोठ्या आवाजाचे सुतळी बाँबसारखे फटाके तसेच लवंगीच्या माळा ध्वनिप्रदूषण वाढवितात असे दिसून आले. एकंदरीतच, फटाके उडविण्याचे मुलांचे आकर्षण कमी करण्यासाठी त्यांना फटाक्यांच्या आवाज व धुराचे दुष्परिणाम लहान वयातच समजावून सांगणे गरजेचे आहे. एखाद्या वर्षी शाळांमधून फटाके न उडवण्याची शपथ दिली जाते आणि नंतर ते मुलांबरोबर थोरांनाही त्याचा विसर पडतो. याशिवाय पर्यावरणपूरक फटाक्यांमध्येही असलेली बेरियम, सल्फर, कॉपरसारखी घातक रसायने खूप घनतेच्या रहिवासी क्षेत्रात आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. फटाक्यांपासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न कमी पडत आहेत असे वाटते. -श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी

तुम्हीही मांडा गाऱ्हाणे…

तुमच्या भागात, क्षेत्रीय कार्यालयातील नागरी समस्या तुम्ही या सदरासाठी पाठवू शकता. त्यासाठी ई-मेल आयडी : lokpune4@gmail.com
(समन्वय : चैतन्य मचाले)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad need facilities to collect garbage even at night pune print news ccm 82 mrj