पिंपरी-चिंचवड परिसरातील एका खाजगी शाळेच्या बैठकीत पालकांनी संस्थाचालकाला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समोर चोप दिल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसात पालकांनी आणि संस्थाचालकांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे.

भोसरी मधील इंद्रायणी नगर येथील श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर या शाळेत पालक आणि संस्था चालकाची बैठक होती. यावेळी या बैठकीला खासदार शिवाजी आढळराव पाटील,पुणे शिक्षण अधिकारी मोरे,महानगर पालिका शिक्षण अधिकारी,आदी उपस्थित होते.दोन तुकड्या असताना संस्थाचाकांनी तिसरी तुकडी सुरू करणार असल्याचे बैठकीत म्हटले.

यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. मात्र वर्ग उपलब्ध नसल्याने संस्थचालक आणि पालकांमध्ये वाद सुरू झाला याचेच पर्यावसन हाणामारीत झाले. संस्थाचालक आणि त्यांच्या दोन मुलांना पालकांनी खासदार आणि अधिकारी यांच्या समोर चोप दिला.याप्रकरणी संस्थचालक आणि पालकांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.याचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

 

Story img Loader