पिंपरी- चिंचवड : ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीचा अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पर्दाफाश केला असून चार तरुणींची सुटका करण्यात आली. छापा टाकण्यात आलेल्या ‘स्पा’च्या महिला मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आहे. निगडीतील ‘फोनिक्स स्पा’वर ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा : मावळ लोकसभा : श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला आमदार शेळके पाठोपाठ भेगडे समर्थकांकडून विरोध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथे इन्स्पिरिया मॉलमध्ये फोनिक्स नावाने सुरू असलेल्या स्पामध्ये वेश्याव्यवसाय केला जात असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. पोलिसांनी ‘फोनिक्स स्पा’मध्ये डमी ग्राहक पाठवला, तिथे वेश्याव्यवसाय केला जातो का ? याची शहानिशा केली. मग ‘स्पा’वर छापा टाकण्यात आला. या प्रकरणी चार तरुणींची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. महिला मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून फरार आरोपी दिनेश गुप्ताचा पोलीस शोध घेत आहेत.