पिंपरी-चिंचवड: अपघातग्रस्त टेम्पोचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना दमदाटी आणि अश्लील शिवीगाळ केल्याची घटना देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात संबंधित प्रसार माध्यमांच्या पत्रकारांनी तक्रार दिली आहे. ही घटना बाराच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसार माध्यमांचे दोन पत्रकार वार्तांकन करून पिंपरी- चिंचवडच्या दिशेने येत होते. तेव्हा, देहूरोड- निगडी रोडवर भरधाव टेम्पो ( एम.एच. १४ जी.डी. ३३०३ ) दुभाजकाला धडकून पलटी झाला. अपघात समोरच घडल्याने पत्रकारांनी दुचाकी थांबवली. घटनेचे वार्तांकन करत मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असताना टेम्पो चालक आणि मालक यांनी अश्लील शिवीगाळ करत धमकावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पिंपरीत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; १७,५०० घरांमध्ये सापडल्या अळ्या

या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. घटने प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात टेम्पो चालक आणि मालकाचा शोध देहूरोड पोलीस घेत आहेत. ही सर्व घटना वाहतूक पोलिसांसमोर घडली. पोलिसांसमोरच ही घटना घडल्याने पोलिसांचा धाक आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad reporter threatened and abused while doing reporting at accident spot kjp 91 css