पिंपरी-चिंचवडमधील निगडी येथे दलदलीत फसलेल्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आलं आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास निगडी परिसरातील मूक-बधिर शाळेच्या पाठीमागे एक व्यक्ती दलदलीत फसल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. अग्निशमन विभागाने तात्काळ तिथे जाऊन त्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निळकंठ पाटील नावाची ही व्यक्ती त्यांच्या घराजवळील शाळेच्या मागे असलेल्या जवळच्या रस्त्याने जात होती. मात्र मुसळधार पावसामुळे झालेल्या दलदलीत ते फसले. ही घटना बघितल्यावर विशाल साळवे या व्यक्तीने ही माहिती निगडी अग्निशमन विभागाला दिली. तात्काळ अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून दोर, शिडी आणि हुकच्या साह्याने निळकंठ पाटील यांना सुखरूप बाहेर काढले.

हेही वाचा… पिंपरी: पवना धरण ५१ टक्के भरले; पण पाणीपुरवठ्याच्या ‘या’ निर्णयात बदल नाही

हेही वाचा… पिंपरी-चिंचवड शहरातील उच्चभ्रू असलेल्या पिंपळे सौदागर येथे रस्ता खचला, जीवितहानी नाही

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी- चिंचवड शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी चिखल झालेला आहे, दलदल तयार झाली आहे. मोकळ्या मैदानात चिखल असलेल्या ठिकाणी अशा घटना घडत असल्याचं समोर आलेलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad the person trapped in the swamp was rescued by the fire department kjp 91 asj
Show comments