पिंपरी : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन आणि मंदिरात विधिवत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. यानिमित्त चिंचवड येथे सामूहिक श्री रामरक्षा स्तोत्र पठण घेण्यात आले. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील शेकडो रामभक्तांनी व विद्यार्थ्यांनी सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण केले. चिंचवडगाव, केशवनगर येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी क्रीडांगण येथे हा उपक्रम पार पडला. या सोहळ्याला प्रसिद्ध निवेदक व अभिनेते राहुल सोलापूरकर, पद्मश्री गिरीश प्रभुणे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचे अध्यक्ष हभप किसन महाराज चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल, जिल्हा कार्यवाह माहेश्वर मराठे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री धनंजय गावडे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पुण्यात कडक बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थेत बदल

राहुल सोलापूरकर म्हणाले की, अयोध्येचा इतिहास फार जुना आहे. अनेक मुस्लिम राजांनी अयोध्येवर आक्रमणे केली. रामजन्मभूमीसाठी इसवी सनपूर्व १५० पासून ८९ लढाया झाल्या आहेत. साडेचार लाख रामभक्तांनी बलिदान दिलेले आहे. आपली आहुती दिलेल्या रामभक्तांचे आपण सर्वांनी स्मरण केले पाहिजे. अयोध्या ही अमृत भूमी आहे. युद्ध करूनही जिंकता येत नाही, अशी ती भूमी आहे. १६ व्या शतकात बाबराने अयोध्येवर हल्ला केला. त्याने राम मंदिराच्या ठिकाणी मस्जिद उभारली. रामजन्मभूमीचा लढा शेवटी न्यायालयामार्फत जिंकावा लागला. प्रभू श्रीराम मर्यादा पुरूषोत्तम होते. आता अयोध्येत राम मंदिर उभे राहिले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad thousands of devotees did ram raksha recitation pune print news ggy 03 css
Show comments