पिंपरी- चिंचवड : निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या ‘स्पा’ मालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात पिंपरी- चिंचवडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला यश आले आहे. याप्रकरणी राकेश शिंदे (स्पा मॅनेजर), अक्षय बनकर (स्पा मालक) आणि आणखी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : “काही जणांना खासदार व्हायचंय”, अजित पवार संजोग वाघेरेंची नाराजी दूर करणार?
पिंपरी- चिंचवड मधील निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘ब्ल्यू- स्टोन स्पा’ या नावाने स्पा सुरू होता. त्या ठिकाणी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. याबाबतची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधकचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना मिळाली. ‘ब्ल्यू स्टोन स्पा’ मध्ये डमी ग्राहक पाठवून खरंच त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालतो का? याबाबतची खात्री चव्हाण यांनी करून त्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात पोलिसांना यश आले असून स्पा मालकासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.