पिंपरी- चिंचवड : येथे बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानकपणे झुकल्याने रात्री एकच खळबळ उडाली. बांधकाम सुरू असलेली ही इमारत खाली कोसळू शकते अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. इमारतीचे वाय पद्धतीचे बांधकाम आहे. दोन पिलर वर इमारत उभारण्यात आली आहे. त्यामुळे ती झुकल्याच सांगण्यात येत आहे.
सविस्तर माहिती अशी की, पिंपरी- चिंचवडमध्ये मध्यरात्री बांधकाम सुरू असलेली इमारत अचानक एका बाजूला झुकली. या घटनेमुळे आजूबाजूचे नागरिक घाबरले होते. अग्निशमन दल, पोलीस आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते. वाकडमधील पोलीस ठाण्यासमोरच्या गल्लीत हे बांधकाम सुरू आहे. तीन मजली असलेली ही इमारत वाय पद्धतीने उभारण्यात आली आहे. दोन पिलरवर उभारण्यात आलेली इमारत असल्यानेच ती झुकल्याचे महानगर पालिका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. ही इमारत पाडण्याची शक्यता आहे. सध्या तरी पोकलेनच्या साहाय्याने इमारतीला सपोर्ट देण्यात आलेला आहे.