पिंपरी : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांतील गृहनिर्माण संस्थांमधून अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यावर मानांकानुसार पाणी पुरवठा होत असल्याचा दावा करत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत गृह निर्माण संस्थांना पत्र पाठविण्यात आले आहे. भूमिगत, इमारतीवरील टाक्यांच्या गळतीबाबत पाहणी करून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे.

शहराची लोकसंख्या वाढत असतानाच पाण्याची मागणीही सातत्याने वाढू लागली आहे. शहराला गेल्या सव्वाचार वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. मार्च महिना सुरू झाल्यापासून पाण्याची मागणी वाढली आहे. शहराला मावळातील पवना धरणातून ५१०, आंद्रा धरणातून पहिल्या टप्प्यात ७५ तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)कडून २० असे ६०५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी दिवसाला दिले जाते. मात्र, आंद्रा धरणातून येणारे पाणी कमी झाल्याने चिखली, चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, भोसरी, दिघी परिसरातून अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे पालिकेने एमआयडीसीकडून अतिरिक्त दहा एमएलडी पाणी वाढविले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा…शरद पवार यांच्या खेळीबाबत उत्सुकता

शहरात ३३१ मोठ्या गृहनिर्माण संस्था आहेत. यापैकी २८४ संस्थांमध्ये सांडपाणी प्रकल्प सुरू असून ४७ संस्थांमध्ये सांडपाणी प्रकल्प बंद आहेत. त्यामुळे काही संस्थांमध्ये पाण्याची समस्या आतापासूनच निर्माण होऊ लागली आहे. मोठ्या संस्थांमधून अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने गृहनिर्माण संस्थांना पत्र पाठविण्यास सुरुवात केली आहे. आपल्या संस्थेतून पाण्याच्या वारंवार तक्रारी येत आहेत. मात्र, ठरलेल्या मानांकानुसार पाणी पुरवठा केला जात असून जलमापकांच्या नोंदीचा तक्ताही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पाठविण्यात येत आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा. सांडपाणी प्रकल्प सुरू ठेवावेत. बोअरवेलचे पाणी स्वच्छतागृहे, उद्यान, इतर कामासाठी वापरावे. पाणी काटकसरीने, जपून वापरण्याबाबत सभासदांमध्ये जागरुकता करावी, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

हेही वाचा…पुणे : सिंहगड रस्त्यावर किरकटवाडीत अफूची शेती

पवना धरणात ५२ टक्के पाणीसाठा

शहराला मुख्यतः मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाचा चटका वाढत असतानाच शहरवासीयांची पाण्याची मागणीही वाढली आहे. धरणात सद्यस्थितीत ५१.९० टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीही आजअखेर इतकाच पाणीसाठा होता. जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा हा साठा असल्याचे धरणाचे शाखा अभियंता रजनीश बरिया यांनी सांगितले.

हेही वाचा…शरद पवारांचे बेरजेचे राजकारण बारामतीत अजितदादांसाठी अडचणीचे

पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले, की काही गृहनिर्माण संस्थांमधून कमी, अपुरा पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ठरलेल्या मानांकानुसारच पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळा सुरू झाला आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

Story img Loader