पिंपरी- चिंचवडमध्ये महिलेचं अपहरण झालं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास काळभोर नगर पुणे- मुंबई जुना महामार्ग परिसरातून हे अपहरण करण्यात आलं. स्कार्पिओ मधून आलेल्या तिघांनी महिलेच अपहरण केल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत आहे. या संदर्भात पिंपरी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. अद्याप गुन्हा दाखल नाही. रात्री आम्ही घटनास्थळी गेलो होतो. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी काळभोर नगर परिसरातून महिलेच्या अपहरणाचा सीसीटीव्ही समोर आणला आहे. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जुना पुणे- मुंबई महामार्गालगत काळभोर नगर येथील एअरटेल गॅलरी च्या समोर मध्यरात्री एकच्या सुमारास महिलेच अपहरण करण्यात आलं. महिलेचा पाठलाग करून अपहरण करण्यात आल्याचे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे.
महिला अज्ञात तिघांचा प्रतिकार करत होती. आरडाओरडा करत होती. परंतु, तिघांनी संबंधित महिलेला बळजबरीने उचलून गाडीतुन अपहरण केल आहे. या प्रकरणाची माहिती पिंपरी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
पिंपरी- चिंचवडमध्ये महिलेचं अपहरण झालं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास काळभोर नगर पुणे- मुंबई जुना महामार्ग परिसरातून हे अपहरण करण्यात आलं. स्कार्पिओ मधून आलेल्या तिघांनी महिलेचं अपहरण केल्याचं सीसीटीव्ही फुटेज… pic.twitter.com/4rq2s7tZtU
— LoksattaLive (@LoksattaLive) April 5, 2025
सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे हे प्रकरण कौटुंबिक वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पिंपरी पोलिसांनी व्यक्त केला आहे. पिंपरी पोलिसात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. अद्याप गुन्हा दाखल नाही. अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिली आहे. तरी देखील आम्ही तपास करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, महिलेच्या अपहरणाचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय आहे. पण, हे अपहरण नसल्याचं पिंपरी- चिंचवड पोलिसांचं म्हणणं आहे. या संदर्भात आणखी एक सीसीटीव्ही समोर आला आहे. ज्या स्कार्पियो मध्ये महिलेला जबरदस्तीने बसवण्यात आलं. त्याच स्कार्पियो मधून महिला आधी उतरल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यामुळे हे प्रकरण अपहरणाचे वाटत नाही. तरीही आम्ही तपास करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी दिली आहे.