पिंपरी- चिंचवडमध्ये वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन तीन मुलांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड करत रिल्स बनवल्याची घटना समोर आली आहे. कोयत्याने वाहनांच्या काचा फोडून सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान केलं आहे. ही घटना मध्यरात्री थेरगाव येथे घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा: बापरे! तासाभरात पाणीच पाणी; चिंचवडमध्ये ११४ मिलिमीटर पावसाची नोंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अज्ञात तीन अल्पवयीन मुलांनी थेरगाव येथे कोयत्याने वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून दोन अल्पवयीन मुलांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिसऱ्या अल्पवयीन मुलाचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, कोयत्याने वाहनांच्या काचा फोडत असताना दुसरा मुलगा रिल्स काढत होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहन तोडफोडचं सत्र थांबलेले होतं. आता पुन्हा वाहन तोडफोडीने डोकं वर काढलं आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस घेत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad young boys vandalized vehicles for reel kjp 91 css