पिंपरी- चिंचवडच्या दरोडा विरोधी पथकाने सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून ३ गावठी पिस्तुले आणि ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. वीरभद्र रघुनाथ देवज्ञ, राहुल बसवराज सर्जन आणि अमोल फिलिप साळवे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई सुमित देवकर आणि गणेश सावंत यांना बातमीदारकडून माहिती मिळाली की, वीरभद्र हा सराईत गुन्हेगार आळंदी घाटाजवळ आला आहे. त्याने पिस्तुल बाळगले आहे. अशी माहिती मिळताच तत्काळ त्याठिकाणी जाऊन सापळा रचून वीरभद्रला ताब्यात घेण्यात आल. त्याच्याकडील एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

हेही वाचा – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहतूक बदल; मुंबईकडे जाणारी एक मार्गिका बंद

हेही वाचा – पुण्यात मराठा सर्वेक्षणाला वेग: ‘एवढ्या’ कुटुंबांची माहिती झाली संकलित

या गुन्ह्याचा अधिक तपास केल्यानंतर राहुल बसवराज सर्जन आणि अमोल फिलिप साळवे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर साळवेकडे दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. अशी एकूण तीन गावठी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे दरोडा विरोधी पथकाने जप्त केली आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी हे करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri criminals in possession of 3 pistols and 4 live cartridges arrested kjp 91 ssb
Show comments