पिंपरी : विरोधक म्हणतात की पंधराशे रुपयात महिलांना विकत घेत आहेत. नालायकांनो आई, बहिणीचे प्रेम कोणीही खरेदी करु शकत नाही. ही योजना माता-भगिणींच्याप्रती कृतज्ञता आहे. त्यांचे प्रेम, साथ यामुळे आम्हाला यश मिळते. परंतु, जे लोक सोन्याचे चमचा घेऊन जन्माला आले. त्यांना पंधराशे रुपयांचे मोल समजू शकत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ बालेवाडीत करण्यात आला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, की परकीयांचे आक्रमण ज्यावेळी आमच्यावार होत होते, त्यावेळी आई जिजाऊंनी सोन्याचा नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना निर्माण केली. मुलींसाठीची पहिली शाळा पुण्यात सुरु झाली. केवळ राजकारण नाही तर समाजकारण, परिवर्तनाची पुणे ही भूमी आहे. त्यामुळे पुण्यातून या योजनेचा शुभारंभ केला.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
The ward staffers also extracted 443 religious and social banners. (Express photos)
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर मुंबईतून १ हजार ९६३ बॅनर्स, झेंडे काढले, ‘या’ वॉर्डात सर्वाधिक बॅनर्स
swapnil rajshekhar tula shikvin changalach dhada
“केरळ फिरतोय, पैसे फुकट गेले…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Eknath khadse Devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस यांच्याशी केवळ तात्विक मतभेद, एकनाथ खडसे यांची भूमिका मवाळ

हेही वाचा : पिंपरी : “मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो की…”, अजित पवार म्हणाले, “आजचा दिवस…”

महायुतीचे सरकार ‘देना बँक’ सरकार आहे. लेना वाले नाही. मागच्या काळात वसुली करणारे सरकार होते. एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये पोहोचले आहेत. प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे एकत्रित पैसे दिले जातील. ही खटाखट सारखी नव्हे फटाफट योजना आहे. थेट खात्यांमध्ये पैसे जातात. बहिणींना ओवाळणी द्यायची म्हटल्यावर सावत्र भावांच्या पोटात दुखायले लागले. न्यायालयात गेले. न्यायालयाने नाकारल्यानंतर जाणीवपूर्वक अर्जावर पुरुष, दुचाकी, बगीच्याचे छायाचित्र वापरले. अर्ज बाद होण्यासाठी कारस्थान केले. संकेतस्थळ बंद पडण्यासाठी डेटा (विदा) टाकला. महिलांचा विकास झाला तरच भारत पुढे जाईल. महिला केंद्रीत योजना सुरु केल्या आहेत. लखपती, लेक लाडकी योजना सुरु केली. अर्थव्यस्थेच्या मुख्य धारेत महिलांना भागीदारी मिळाली पाहिजे. महिलांना अर्थव्यस्थेच्या केंद्रात आणल्यास राज्याची अर्थव्यस्था वेगात वाढेल. पूर्वी सरकारी योजना दलालांची होत होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीबीटीची योजना सुरु केली आहे. आधार, बँक आणि मोबाईल या त्रिशुळमुळे थेट खात्यात पैसे पडले. दलालांचा धंदा बंद केल्याचेही फडणवीस म्हणाले.

Story img Loader