पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाटा येथे शनिवारी दुपारी मेट्रोचे काम सुरु असताना खड्डे पाडणारी भली मोठी ड्रिल मशीन रस्त्यावर कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नेमका हा प्रकार कसा घडला हे अस्पष्ट आहे. मात्र मेट्रोचा हा भोंगळ कारभार पाहून संताप व्यक्त केला जातोय.

या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. दैव बलवत्तर असल्याने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा मुंबई पुणे जुना महामार्ग आहे त्यामुळे इथे नेहमी वाहनांची वर्दळ असते. आज दुपारी अचानक भली मोठी ड्रिल मशील थेट रस्त्यावर कोसळली. त्यामुळे मेट्रोचे काम सुरु असताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या अपघातात जिवीत व वित्तहानी झालेली नाही. ही एक दुर्देवी घटना असून याची चौकशी करण्यात येईल असे महाराष्ट्र मेट्रोकडून सांगण्यात आले आहे. सुरक्षा नियमांचे पालन करण्यासंदर्भात कंत्राटदारांना कठोर इशारा देण्यात येईल असे मेट्रोकडून सांगण्यात आले आहे. वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रोकडून सर्व प्रयत्न करण्यात येत असून पुढच्या काही तासात वाहतूक पूर्वपदावर येईल असे मेट्रोकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र मेट्रोचे सुरक्षा अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

Story img Loader