पिंपरी : सातत्याने कारवाई करूनही कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच असून आता कोयत्याची जागा हातोडीने घेतली आहे. शिक्षिका लिफ्टमधून जात असताना लिफ्टमध्ये आलेल्या एकाने तिच्या डोक्यात हातोडीने मारून तिला गंभीर जखमी करत गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना जुनी सांगवी येथे घडली.

जखमी शिक्षिकेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिक्षिका या खासगी शिकवणी घेतात. तसेच घरी जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कामही करतात. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास फिर्यादी शिक्षिका या नेहमीप्रमाणे पांलाडे निवास येथील एका कुटुंबातील मुलाला शिकवण्यासाठी चालल्या होत्या. इमारतीच्या वाहनतळामधील लिफ्टमध्ये संबंधित विद्यार्थ्यांची आई आणि फिर्यादी शिक्षिका गेल्या. यावेळी त्यांच्या पाठीमागून आरोपी अचानक लिफ्टमध्ये आला. त्याने शिक्षिकेच्या डोक्यात, पाठीत आणि खांद्यावर हातोडीने मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर शिक्षिकेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावली आणि पसार झाला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी केली. आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याआधारे पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक कलगुटके तपास करीत आहेत.

Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
amazing magic of the students of the Zilla Parishad school
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच
school Teacher misbehaved with girls
रत्नागिरी शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षकाचे विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत शिक्षकाला केले निलंबित
Cash worth Rs 3 lakh stolen from school on Law College Road Pune news
पुणे: विधी महाविद्यालय रस्त्यावरील शाळेतून तीन लाखांची रोकड चोरी
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
Representative Image
“मी अभ्यास करू शकत नाही, हे माझ्या आवाक्याबाहेर…” कोटामध्ये IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

हेही वाचा : Cyber Crime: काय सांगता? वर्षभरात ४२९ करोडचा नागरिकांना गंडा; ३७ हजार तक्रारी, नेमकं सायबर पोलीस काय म्हणाले? वाचा..

लग्नाबाबत विचारल्याने तरुणीला हातोडीने मारहाण

तरुणीने मित्राला लग्नाबाबत विचारणा केली असता मित्राने तरुणीच्या डोक्यात हातोडीने मारून तिला गंभीर जखमी केल्याची घटना चाकण येथे मार्केटयार्ड चौकात घडली. जखमी तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक हेमंत लेंडघर (वय २४, रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुणी आणि अभिषेक हे मित्र- मैत्रीण आहेत. तरुणीने अभिषेकला लग्नाबाबत विचारणा केली. त्यावरून अभिषेक याने तरुणीला लग्नास नकार देत हातोडीने तिच्या डोक्यात आणि हातावर मारले. त्यानंतर तरुणीच्या गाडीवर हातोडीने मारून गाडीचे नुकसान केले. तरुणीला त्रास होऊ लागल्याने त्या रुग्णालयात गेल्या असता तिथेही आरोपीने तरुणीला मारहाण केली. पोलीस हवालदार रेंगडे तपास करीत आहेत.

Story img Loader