पिंपरी : तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगून पतीने त्याचे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुनावळे येथे घडली. पीडिता आणि सर्व आरोपी हे उच्चशिक्षित असून, एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत.

याप्रकरणी ३० वर्षीय पत्नीने ठाणे शहरातील एका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मात्र, हा प्रकार रावेत भागात घडल्याने हे प्रकरण तपासासाठी बुधवारी (१६ ऑक्टोबर) रावेत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. अभियंता असणाऱ्या पत्नीने फिर्याद दिल्यानंतर तिच्या पतीसह चार जणांविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत पुनावळे येथे घडली आहे.

हेही वाचा : पिंपरी: दोन अल्पवयीन विद्यार्थिनींशी शाळेतील कर्मचाऱ्याचे अश्लील चाळे, महापालिकेने खासगी संस्थेला चालवण्यास दिलेल्या शाळेतील धक्कादायक प्रकार

आरोपी असलेल्या पतीने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी आपल्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगितले. तसेच या अत्याचाराची अश्लील चित्रफित तयार केली. ती चित्रफित प्रसारित करण्याची धमकी दिली. तसेच पतीने पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्यही केले. पत्नीने त्यास विरोध केला असता, तिला शिवीगाळ केली. पत्नी सध्या ठाणे येथे असलेल्या घरी राहून काम करत आहे. तिचे आणि पतीचे गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. पुनावळे येथे हा प्रकार घडला तेव्हा सगळे जण एका पार्टीसाठी आले होते. त्यानंतर सलग तीन दिवस पतीने त्याच्या मित्रांबरोबर पत्नीला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडल्याचे पत्नीचे म्हणणे आहे. रावेत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader