पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मोरवाडीत समतल विलगकामध्ये ( ग्रेड सेपरेटर) हवाई दलाचा टेम्पो उलटला. दुचाकीस्वाराला वाचविताना टेम्पो उलटल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुन्या पुणे-मुंबई महामार्गाववरून हवाई दलाचा टेम्पो मुंबईच्या दिशेने जात होता. समतल विलगातून जात असताना मोरवाडीत टेम्पोला एक दुचाकीस्वार आडवा आला. त्याला वाचविताना टेम्पो उलटला. टेम्पोतून रस्त्यावर ऑइल गळती झाली आहे. रस्त्याच्या मध्यभागी टेम्पो उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. खराळवाडीतून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

हेही वाचा : मावळमध्ये उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे डोकेदुखी वाढली; ३३ उमेदवार रिंगणात

पिंपरी पोलीस आणि वाहतूक विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन विभागाला बोलविण्यात आले. पाण्याने रस्ता धुवून काढला आहे. दरम्यान, टेम्पो सरळ करण्यासाठी क्रेन बोलविण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri huge traffic jam on old pune mumbai highway due to air force tempo overturned pune print news ggy 03 css