पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लेडीज टेलरने दहा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करत मोबाईलमध्ये नग्न फोटो घेतल्याचं प्रकरण समोर आल आहे. याप्रकरणी सनवर मोहरम शहा वय- २८ वर्षे याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सनवरला संतापलेल्या नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड शहरामध्ये सांगवी भागात ‘मेहक लेडीज टेलर’ नावाचे दुकान आहे. तिथे आरोपी सनवर मोहरम शहा हा काम करतो. पीडित अल्पवयीन मुलीने त्या ठिकाणी फ्रॉक शिवण्यासाठी दिला होता. फ्रॉक शिवून झाल्यानंतर आरोपी सणवरने तिच्या घरच्यांना फ्रॉक शिवून झाल्याचं सांगत पीडित मुलीला पाठवून देण्यास सांगितलं. फ्रॉकच माप व्यवस्थित आहे का? नाही हे बघण्यासाठी पीडितेला दुकानात बोलावलं. तेव्हा तिच्या अंगावरील कपडे काढून अश्लील चाळे करत तिचे नग्न फोटो काढले असल्याचे तिच्या आईला सांगितलं आहे.

हेही वाचा – VIDEO: गोष्ट पुण्याची – २५० वर्षांपूर्वीची पेशवेकालीन भुयारी नळयोजना आजही आदर्श का? जाणून घ्या

हे सर्व प्रकरण आईला समजल्यानंतर दुकानाच्या समोर गोंधळ निर्माण झाला. ही बाब आजूबाजूच्या नागरिकांना, दुकानदारांना समजताच नागरिकांनी आरोपी सनवरला चांगलाच चोप दिला. घटनास्थळी सांगवी पोलिसांनी येऊन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पीडित मुलगी घाबरलेल्या अवस्थेत आहे. या घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.