पिंपरी : शहरातील अतिशय मोक्याच्या दहा ठिकाणच्या जागा यापूर्वी घेतल्यानंतर आता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पिंपरी ते निगडी विस्तारित मार्गासाठी आणखी १५ जागांची महापालिकेकडे मागणी केली आहे. त्यातील बहुतांश जागा कायमस्वरूपी देण्याबाबत महामेट्रोने आग्रह धरला आहे.

दापोडी ते पिंपरी मार्गावरील मेट्रोची मार्गिका पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली आहे. यासाठी महापालिकेने शहरातील अतिशय मोक्याच्या दहा ठिकाणच्या जागा पुणे मेट्रोसाठी ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने हस्तांतरित केल्या आहेत. मात्र, महामेट्रोची स्थिरता, तिकिटेतर उत्पन्न वाढविण्यासाठी या जागांचा वाणिज्यिक वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने या जागा मेट्रोला मालकी हक्काने आणि बिनशर्त द्याव्यात, अशा सूचना राज्य सरकारने आयुक्तांना दिल्या आहेत. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

senior officials of railways to provide more than 60 rakes twice for onion transport
नाशिक : कांदा देशभरात पाठविण्यासाठी यंदा दुप्पट रेक, व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार रेल्वेची तयारी
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
60 feet road at chinchpada in kalyan east in worse condition
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्याची दुर्दशा; शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल
19 tenders for road work worth 11 thousand crores in the state
राज्यातील ११ हजार कोटींच्या रस्ते कामासाठी १९ निविदा
Permanent reservation, disabled persons,
दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसगाड्यांमध्ये कायमस्वरूपी आरक्षण
pune metro, jangali maharaj road, FOB
जंगली महाराज रस्त्यावरील मेट्रोच्या पादचारी पुलामुळे नवा वाद? पुलाची उंची कमी असल्याबाबत गणेश मंडळांची नाराजी
Houses were inspected by the municipal health department to control dengue and chikungunya Nagpur
पाणी भरलेले भांडे उघडले की डासांच्या लाखो अळ्या…नागपुरातील ६.४४ लाख घरांत…
Market Licensing Department, illegal meat sellers,
कल्याणमध्ये अवैध मांस विक्रेत्यांवर बाजार परवाना विभागाची कारवाई

हेही वाचा : लोकसभेच्या निवडणुकीअगोदर आमच्याकडे कोणी बघतही नव्हते, आता…; जयंत पाटील यांची फटकेबाजी

पिंपरी ते निगडी या मार्गावरील मेट्रो मार्गिका, स्थानके, प्रवेशद्वार, जिना आणि उद्वाहन (लिफ्ट), वाहनतळासाठी महामेट्रोने महापालिकेकडे १५ जागांची मागणी केली आहे. या जागांमध्ये निगडी बस टर्मिनल येथील सहा जागा आहेत. त्यांचे क्षेत्रफळ ३ हजार ५६२.२९३ चौरस मीटर आहे. निगडी येथील रिकामी व पदपथाची जागा अशा दोन जागा त्यांना हव्या आहेत. त्याचे क्षेत्रफळ ६१६.४५ चौरस मीटर आहे. आकुर्डी येथील मौलाना अबुल कलाम आझाद विद्यालयाच्या एकूण २८५.३३ चौरस मीटर अशा दोन जागा, आकुर्डी येथील पदपथाच्या पाच वेगवेगळ्या जागा (क्षेत्रफळ ४१९.१६) मेट्रोला हव्या आहेत, अशी ४८८४ चौरस मीटर जागा महामेट्रोने मागितली आहे. त्यातील बहुतांश जागा या कायमस्वरूपी देण्याची मागणी केली आहे.

मेट्रोची चार स्थानके

पिंपरी ते निगडी मार्गावर मेट्रोची चार स्थानके असणार आहेत. चिंचवड स्टेशन, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, निगडीतील टिळक चौक आणि भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पीएमपीएमएल आगारात शेवटचे स्थानक असणार आहे. स्थानकांच्या उभारणीसाठी त्या ठिकाणच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यावरील पदपथाची जागा मेट्रोला हवी आहे.

हेही वाचा : लोणावळा: मद्यधुंद पर्यटक २०० फुट उंच डोंगरावरून पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर उतरला! मित्रांसोबत झाला होता किरकोळ वाद

महामेट्रोने पिंपरी ते निगडी मार्गावरील विविध १५ जागांची मागणी केली आहे. भाडेतत्त्वावर जागा देण्यात येणार आहेत. त्या संदर्भातील मूल्यांकन करून दर ठरविण्यासाठी नगररचना विभागास पत्र दिले आहे. त्यांच्याकडून उत्तर मिळाल्यानंतर नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले. स्थानके, प्रवेशद्वार, जिन्यासाठी जागा लागणार आहे. त्यासाठी १५ जागांची महापालिकेकडे मागणी केली असल्याचे महामेट्रोचे संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.