पिंपरी : नवीन वीजजोडण्यांची वाढती मागणी, सद्यस्थितीत असलेल्या वीजयंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी चऱ्होली आणि मोशीत नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. भोसरीतील उपकेंद्रात ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र लावण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मान्यता दिली. हा प्रस्ताव महावितरणकडून महापारेषणकडे पाठविण्यात आला आहे. नवीन उपकेंद्र उभारणे व क्षमतावाढ आदींची कामे महापारेषणकडून करण्यात येणार आहे.

या दोन नवीन अतिउच्चदाब उपकेंद्रांमुळे, उपकेंद्राच्या क्षमतावाढीमुळे महापारेषणच्या भोसरी, टेल्को, मरकळ या अतिउच्चदाब उपकेंद्रावरील वीजभार मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरासह भोसरी, एमआयडीसी परिसर, चऱ्होली, प्राईड वर्ल्ड सिटी, दाभाडेवस्ती, लोहेगाव, धानोरी, मोशी, आळंदी, जाधववाडी, शिवाजीवाडी, तुपेवस्ती, चिंबळी, केळगाव, डुडळगाव, चोवीसवाडी, वडमुखवाडी, बोऱ्हाडेवाडी यासह महापालिकेच्या पाणीपुरवठा केंद्र, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, कचरा डेपोला सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. वीजपुरवठा खंडित होण्याच्या तांत्रिक प्रमाणात घट होईल. तसेच काही कारणांमुळे वीज खंडित झाल्यास सक्षम पर्यायी व्यवस्था उपलब्ध होणार आहे. वीजहानीमध्ये देखील घट होणार आहे.

nashik special campaign for provide electricity connections to Zilla Parishad owned Anganwadi
७४२ अंगणवाड्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा, विशेष मोहिमेतंर्गत कार्यवाही
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
445 Anganwadis in Shahapur taluka in darkness due to lack of electricity connection
शहापूर तालुक्यातील ४४५ अंगणवाड्या वीज जोडणी अभावी अंधारात
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
Sambhal Jama mosque
संभल येथील जामा मशिद परिसरातील विहिरीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मंदिर की मशिदीला मिळणार पाणी?
mumbai municipalitys bridge connecting Marve and Manori beaches has received approval
मार्वे मनोरी जोडणाऱ्या पुलाला पर्यावरणाची मंजुरी
hawker removal team of A ward of municipality took action on hawkers in Shahad railway station
कल्याणजवळील शहाड रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर कारवाई, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या फलक कमानी, निवारे जमीनदोस्त
sugar factories Bramhapuri , Vijay Wadettiwar,
चंद्रपूर : ब्रम्हपुरी परिसरात लवकरच पाच साखर कारखाने, आमदार विजय वडेट्टीवार यांची माहिती

हेही वाचा : मराठा आरक्षणावरुन छावा संघटनेचा इशारा, “मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी कुठल्याच नेत्याला आम्ही ध्वजारोहण…”

सध्या अस्तित्वात असलेल्या महापारेषण कंपनीच्या भोसरी आरएस एक, दोन तसेच मरकळ, टेल्को व सेन्चुरी एन्का या पाच अतिउच्चदाब उपकेंद्रातून महावितरणच्या ३३ केव्ही व २२ केव्ही क्षमतेच्या एकूण ६६ वीजवाहिन्यांना वीजपुरवठा केला जातो. या सर्व वाहिन्यांचे विभाजन, लांबी कमी करून त्याचा वीजभार नव्याने उभारण्यात येणाऱ्या चऱ्होलीतील प्राईड वर्ल्ड सिटी व मोशीतील सफारी पार्क २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रावर देण्यात येणार आहे. ‘अतिउच्चदाबाचे दोन नवीन उपकेंद्र व एका उपकेंद्राच्या क्षमतावाढीस मंजूरी दिली आहे. यातून ४०० एमव्हीएचा वीजभार उपलब्ध होणार आहे. अस्तित्वात असलेल्या पाच अतिउच्चदाब उपकेंद्रांवरील वीजभार कमी होईल. त्याचा सुरळीत वीजपुरवठ्यासाठी पिंपरी-चिंचवड, भोसरी एमआयडीसी परिसर आणि सुमारे २० गावांना थेट लाभ होणार आहे’, असे महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी म्हटले आहे.

Story img Loader