पिंपरी : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरी- चिंचवडमध्ये साखळी उपोषण सुरू असून पुढारी आणि नेत्यांना आम्ही शहरात कुठलाही कार्यक्रम किंवा सभा घेऊ देणार नाही, असा इशारा दिला गेला होता. आज अंबादास दानवे पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात भेट देण्यास येणार आहेत. त्यापूर्वी पोलिसांनी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यांना विरोध करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
हेही वाचा : कसबा पेठेत मेट्रो कामगारांना मारहाण करुन रोकड लुटली
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात भेट देण्यासाठी येत आहेत. तर, दुसरीकडे मराठा समाज हा आरक्षणासाठी आक्रमक आहे. पिंपरी- चिंचवड शहरात कुठल्याही नेत्याला सभा, कार्यक्रम घेऊ देणार नाही, त्यांना फिरकू देणार नाही असा इशारा सकल मराठा बांधवांकडून देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर वायसीएम परिसरातून सखल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अवघ्या महाराष्ट्रात गावा- गावात नेत्यांना फिरकू दिलं जात नाही. त्याचं लोण आता शहरात देखील बघायला मिळत आहे.