पिंपरी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बारा-एकच्या परवानगीसाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगताच पणन मंत्री अब्दुल सत्तार संतापले. वाद निर्माण होईल असे वक्तव्य करु नका असे म्हणत माइकचा ताबा घेतला. उपस्थित सभापतींनी पदाधिकाऱ्यांना बोलू देण्याची विनंती करताच मंत्री सत्तार यांनी मला राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीला जायचे असे म्हणून परिषदेतून काढता पाय घेतला. त्यामुळे एकच गोंधळ झाला. अब्दुल सत्तार यांचे करायचे काय. खाली डोक वर पाय, पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणांनी गुरुवारी निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह दणाणून सोडले.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोयी-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना इत्यादी विषयाचे अनुषंगाने संवाद साधण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांची गुरुवारी (दि. ३) निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सहकार व पणन, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पणन संचालक विकास रसाळ, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रविणकुमार नहाटा, पुणे कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आणि राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, सचिव, राज्य बाजार समिती संघाचे सदस्य उपस्थित होते.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
What Suresh Dhas Said ?
Suresh Dhas : “…यांनी बीडचा ‘बिहार’ नाही तर ‘हमास’, ‘तालिबान’ केला”, सुरेश धस यांची टीका
Suresh Dhas
Suresh Dhas : “पहिली पसंती मुख्यमंत्र्यांना, अजित पवार झाले तर…”, बीडच्या पालकमंत्री पदाबाबत सुरेश धस यांचं स्पष्ट मत

हेही वाचा : प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक, नेमकं काय कारण? वाचा सविस्तर…

पणन मंत्री अब्दुल सत्तार नियोजीत कार्यक्रमाला दोन तास उशिरा पोहचले. तेथे आल्यानंतर केवळ एकच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले. त्यानुसार उपसभापती संतोष सोमवंशी बोलण्यास उभे राहिले. बारा-एकच्या परवानग्यात आर्थिक व्यवहार होत आहेत. पणन मंडळाकडून पैसे घेतले जातात असे सांगत असताना मंत्री सत्तार चिडले. तुम्ही तुमचे प्रश्न मांडा. वाद निर्माण होईल असे वक्तव्य करु नका असे म्हणत माइकचा ताबा घेतला.उपस्थित सभापतींनी सोमवंशी यांना बोलू देण्याची विनंती करताच मंत्री सत्तार यांनी मला राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीला जायचे असे म्हणून परिषदेतून काढता पाय घेतला. त्यामुळे उपस्थित सभापती संतापले. सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अब्दुल सत्तार यांचे करायचे काय. खाली डोक वर पाय, पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या. सत्तार यांचे पोस्टर फाडले. सत्तार यांच्या निषेधाचा ठराव केला. सत्तार यांच्या निषेधार्थ सोमवारी बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader