पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कोणताही आमदार अपात्र होणार नाही, असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. नियमबाह्य काहीच केले नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीत त्याचा आदर राहील. शिंदे यांना विधानपरिषदेवर जाण्याच्या दुसऱ्या पर्यायाची आवश्यकता भासणार नाही, असेही ते म्हणाले. देसाई यांनी बालेवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासह विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. या वेळी देसाई यांना आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी, कारवाई याबाबत प्रश्न विचारण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : शहराध्यक्ष पदावरून पिंपरी काँग्रेसमधील गटबाजी उघड; जुन्या पदाधिकाऱ्यांकडून प्रदेशाध्यक्षांना पत्र

देसाई म्हणाले, की शिवसेनेचा एकही आमदार अपात्र होणार नाही. कायद्याचा अभ्यास केला असून चौकटीत बसणारा, सर्व बाजू तपासून आम्ही निर्णय घेतला. कोणताही नियमभंग केला नाही, पक्ष सोडला नाही. नेतृत्वाबाबत आमचे मतभेद होते. त्यामुळे नेतृत्व बदलण्यासाठीचा उठाव केला होता. ज्या चिन्हावर निवडून आलो, ते धनुष्यबाण नियमाने आम्हाला मिळाले.