पिंपरी : प्रवासी महिलेचा विनयभंग करून फरार झालेल्या ओला कॅब चालकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. तसेच त्याची कॅब जप्त करण्यात आली आहे. राहुल पांडुरंग म्हस्के (रा.थेरगाव) असे अटक केलेल्या कॅब चालकाचे नाव आहे. याबाबत एका महिलेने १४ मे रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिलेला कोरेगाव पार्कला मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता जायचे होते. त्यासाठी त्यांनी आरोपी राहुल याची एम.एच १४ एल.बी ४१३३ या क्रमांकाची कॅब बुक केली. राहुल याने कॅब कोरेगाव पार्कच्या दिशेने नेली नाही. उलट दिशेने देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणली.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात

हेही वाचा…‘तो’ परीक्षेत लिहितो चक्क पायाने…

फिर्यादी महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेऊन मोटारीतच विनयभंग केला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी राहुल हा ओळख लपवून वावरत होता. संपूर्ण पत्ता माहिती नसताना देहूरोड पोलिसांनी आरोपी राहुल याला अटक केली. गुन्ह्यातील कॅब जप्त करण्यात आली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.