पिंपरी : पीएमपीएमल बसची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी देहू-मोशी रस्त्यावर घडली. उस्मान मुस्ताक अली खान (वय २१) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बस चालक नामदेव मंचकराव केंद्रे (वय २८, रा. आळंदी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निजाम खान (वय ३५, रा. जाधववाडी, चिखली) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा : हिवाळी अधिवेशन सुरू झाले तरी पावसाळी अधिवेशनातील घोषणा हवेतच; पिंपरी- चिंचवडकरांकडून ४७ कोटी सेवाशुल्क वसूल
फिर्यादी खान यांच्याकडे उस्मान कामाला होता. उस्मान दुचाकीवरुन देहूरोडने कुदळवाडीकडे जात होता. पीएमपीएमएल बस चालक नामदेव यांनी हयगयीने, निष्काळजीपणाने बस चालवत उस्मानला धडक दिली. त्यात तो खाली पडला आणि जागीच मृत्यू झाला. फौजदार आंगज तपास करत आहेत.