पिंपरी : भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक या मार्गावर निगडी प्राधिकरण येथे उभारलेल्या अनधिकृत होर्डिंग प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे परवाना निरीक्षक राजेंद्र चौधरी यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत होर्डिंग बाबत कठोर धोरण अवलंबले आहे. विना परवाना होर्डिंग शोधण्यासाठी पथके तयार केली आहेत. हे पथक भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक दरम्यानच्या रस्त्याने जात होते. निगडी प्राधिकरण सेक्टर क्रमांक २६ येथे रेल्वे पुलावर दिशा दर्शक फलकाच्या कमानीवर अनधिकृत होर्डिंग आढळून आले. त्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात एक हजार १३५ अधिकृत होर्डिंग आहेत. तर, शंभर होर्डिंग धारकांचा परवाना नुतनीकरण झाले नाही. अत्याधुनिक ‘एआय’ आधारीत प्रणालीद्वारे शहरात असलेले आणि नव्याने उभारले जाणाऱ्या जाहिरात होर्डिंगवर देखरेख, नियंत्रण ठेवले जाणार आहे. आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष केले जात होते. ‘एआय’ या प्रणालीमुळे या कामासाठी लागणाऱ्या वेळेमध्ये आणि खर्चात बचत होणार आहे. शहरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करणे सुलभ होणार आहे. आवश्यक ठिकाणी होर्डिंग उभारता येणार आहेत. या खासगी संस्थेला वाढलेल्या उत्पन्नातून १५ टक्के रक्कम महापालिका देणार आहे. संस्था हे काम दहा वर्षे करणार आहे.

Story img Loader