पिंपरी- चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने घंटानाद आंदोलन केले. हे सरकार रोहित पवार यांच्या पाठीमागे जाणूनबुजून ईडी लावत असल्याचा आरोप करत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस आणि आंदोलक समोरासमोर आले होते. आंदोलक देखील अधिक आक्रमक झाले होते. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका क्षुलक्षणा धर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेला कर्जाचे डोहाळे! सुशोभीकरण, रुग्णालयासाठी ५५० कोटींचे कर्ज घेणार

पिंपरी- चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे. शहरात राष्ट्रवादीत दोन गट पडले असून रोहित पवार यांच्या समर्थनार्थ आणि महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जोरदार घोषणाबाजी करत शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारचा निषेध करण्यात आला. महानगर पालिकेत १,२०० कोटींचा टीडीआर घोटाळा झाला. श्रीमंत महानगर पालिकेला आज ५०० कोटींचे कर्ज काढण्याची वेळ येते आहे. ६५ हजार कोटींच्या ठेवी मोडण्याची वेळ का आली ? असे अनेक प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri sharad pawar ncp faction protest against rohit pawar ed notice and pmc corruption kjp 91 css