पिंपरी चिंचवड : येथील तळवडे रेडझोनमधील अनधिकृत ‘स्पार्कल’ मेणबत्ती (कँडल) तयार करणाऱ्या कंपनीतील स्फोटात सहा महिला कामगारांचा काल होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्या घटनेतील १० जखमी रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी आज २ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर उर्वरित आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच दरम्यान ससून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची भेट शिवसेनेच्या नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जखमी रुग्णांची भेट घेतल्यानंतर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, तळवडे येथील घटना गंभीर असून रूग्णांची अवस्था पाहवेनाशी आहे. अशा स्थितीतही एका पीडित व्यक्तीने त्या अवस्थेतही नमस्कार केला आणि ताई आमच्या कुटुंबाच्या मागे उभे रहा, हे शब्द ऐकताच सरकार आणि आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहे. एक माणूस म्हणून आम्ही आपल्या कुटुंबासोबत आहोत, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा असे त्यांना सांगितले.

हेही वाचा : पिंपरी : तळवडे दुर्घटनेतील आणखी दोघांचा मृत्यू; मृतांची एकूण संख्या ८, तर इतर ८ जणांची प्रकृती चिंताजनक

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, “तळवडे घटेनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच पंतप्रधान सहाय्यता निधी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडूनही मदत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच गंभीर जखमी रूग्णांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि ते लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri talwade fire incident deputy speaker neelam gorhe visit injured patients at sassoon hospital svk 88 css