पिंपरी : मतदान करण्यासाठी गेल्यानंतर बंद असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून दोन लाख ३७ हजारांचा ऐवज लांबविणाऱ्या सराइत चोरट्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी ( १३ मे) दुपारी उद्यमनगर, पिंपरी येथे घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहन राणोजी शिंदे (वय २३, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. उद्यमनगर मधील श्रुती एन्क्लेव्ह या गृहनिर्माण संस्थेत राहणारे दीपक मुरलीधर वाघमारे हे सोमवारी दुपारी सदनिकेला कुलूप लावून मतदान करण्यासाठी गेले. ते पावणे चारच्या सुमारास मतदान करून परत आले असता सदनिकेचे कुलूप तुटलेल्या स्थितीत होते. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता त्यांच्या घरातून सोन्याचे ३२ ग्रॅम दागिने, घड्याळ, दोन मोबाईल फोन असा एकूण दोन लाख ३७ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे आढळले.

हेही वाचा : मावळमध्ये घटलेल्या मताचा कोणाला फटका? नेमके किती झाले मतदान?

वाघमारे यांनी पिंपरी ठाण्यात गुन्हा नोंदवला. सराइत गुन्हेगार रोहन याने हा गुन्हा केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन लाख ३७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रोहनवर या पूर्वी वाहन चोरी, इतर मालमता चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri theft in the house of a family who went to vote pune print news ggy 03 css
Show comments