पिंपरी : जमीन मोजणीसाठी आलेल्या भूमापन अधिकाऱ्याला विरोध, धक्काबुक्की करत तीन महिलांनी पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तीन महिलांसह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी ( २ एप्रिल) खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेश बाळासाहेब साबळे, नामदेव बबन साबळे, चांगदेव बबन साबळे, संदीप नामदेव साबळे, भरत भाऊसाहेब साबळे, बाळराजे चांगदेव साबळे, बापू चांगदेव साबळे, पेटवून घेणाऱ्या तीन महिला आणि अन्य एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खेड-राजगुरूनगर भूमी अभिलेख कार्यालयातील परीक्षण भूमापक धनंजय ठाणेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा…पिंपरी : निघोजे बंधाऱ्याला गळती…पिंपरी-चिंचवडमधील समाविष्ट गावांत पाण्याचा प्रश्न

ठाणेकर आणि त्यांचे सहकारी दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार साबळेवाडी येथे जमिनीची शासकीय मोजणी करत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी ठाणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जमीन मोजणीस विरोध केला. ठाणेकर यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून शिवीगाळ केली. शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. मदतनीस विठ्ठल गावंडे यांच्या हातातील जीपीएस मशीन ओढून घेतली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तीन महिलांनी स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri three women attempt suicide by fire themselves protest land survey officer at sablewadi khed taluka pune print news ggy 03 psg