पिंपरी : मोठ्याने शिव्या का देतो, असे विचारल्याचा राग आल्याने महिलेची दुचाकी पेट्रोल टाकून आग लावून जाळली. ही घटना बुधवारी पहाटे चारच्या सुमारास खेड येथे घडली. याप्रकरणी समीर रेहमत अन्सारी (रा. चाकण, खेड) याला अटक केली आहे. लता अरुण जाधव (वय ५७) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा : पिंपरीत जेष्ठ व्यवसायिकाला लुटणाऱ्या चौघांना बेड्या; मिर्चीपूड टाकून लुटले होते २७ लाख
फिर्यादी जाधव यांचा मुलगा सुहास आणि शेजारी राहणारा आरोपी समीर यांच्यात दीड महिन्यांपूर्वी शिव्या देण्यावरुन शाब्दिक चकमक झाली. सुहासने आरोपी समीरला मोठ्याने शिव्या का देतो असे विचारले होते. या जुन्या भांडणाचा राग मनात धरुन समीर याने जाधव यांची राहत्या घरासमोरील भिंतीलगक पार्क केलेली दुचाकी पेट्रोल टाकून आग लावून जाळून नुकसान केले. चाकण पोलीस तपास करत आहेत.
First published on: 30-11-2023 at 14:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri woman s bike burnt with petrol after she asked her neighbour why he was cursing loudly pune print news ggy 03 css