पिंपरी : मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याने युवकाचा खून करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. भैय्या गमन राठोड (वय ३३, रा. पाटीलनगर, चिखली. मूळ रा. जळगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुरज हनुमंत इंगळे (वय २९), मेहुल कैलास गायकवाड (वय २८), अजय अशोक कांबळे (वय २४, रा. पाटीलनगर, चिखली) यांना अटक करण्यात आली आहे. 

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटीलनगर चिखली येथे वन विभागाच्या जागेत भैय्या याचा रविवारी खून झाला. परिसरातील ५० ते ६० ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे तपासले. त्यानुसार आरोपींना चिखली मधून ताब्यात घेण्यात आले. मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याने खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. भैय्या हा मागील तीन महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात कामासाठी आला होता. तर, अजय याच्यावर चिखली, पिंपरी आणि म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.

Story img Loader