पुणे : मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अत्याचार केल्यानंतर मुलीला धमकावून पसार झालेल्या आरोपी तरुणाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. अविनाश पवार (रा. समर्थनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत मतिमंद मुलीच्या आईने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडवर पाणीटंचाईचे संकट?… पवना धरणातील पाणीसाठ्यात घट

तक्रारदार महिलेची दहा वर्षांची मुलगी मतिमंद आहे. आरोपी पवारने मतिमंद मुलीला धमकावून तिच्याशी अश्लील कृत्य केले. या प्रकाराची कोणाला वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच मुलीला मारहाण करुन तो पसार झाला. घाबरलेल्या मुलीने आईला याबाबतची माहिती दिली. बालकांचे लैंंगिक अत्याचारांपासून संरक्षण (पोस्को), तसेच बलात्कार केल्याप्रकरणी पवारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune 10 year old mentally retarded girl raped by a youth pune print news rbk 25 css