पुणे : महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) पथकाने पुणे परिसरातून तब्बल ५० कोटी रुपयांचा १०१ किलो मेथाक्युलोन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. पुणे परिसरातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी डीआरआयच्या पथकाकडून तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथील रहिवासी असलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी कायद्यातील (एनडीपीएस कायदा १९८५) तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : २५० कोटी हवेत?…मग ‘हा’ बदल करा; केंद्राचा पुणे महापालिकेला आदेश

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पुण्यातून एक वाहन जप्त करण्यात आले होते. वाहनात पांढरे स्फटिकाचे साहित्य असलेले ४ निळ्या रंगाचे प्लास्टिकचे ड्रम आढळून आले. यामध्ये मेथाक्युलोन हा पदार्थ आढळला. अटक करण्यात आलेले आरोपी बेकायदा विक्री, खरेदी, वाहतूक आणि निर्यातीत गुंतलेले असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. मेथाक्युलोन अमली पदार्थ विक्रीचे जाळे देशातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले असल्याची शक्यता असून, त्याअनुषंगाने तपास करण्यात येत आहे.