पुणे : नगर रस्त्यावरील वाघोलीत झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. खासगी बसच्या धडकेने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुसऱ्या एका अपघातात दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

खासगी बसच्या धडकेने मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी खासगी बसचालकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा लक्ष्मण वाघमारे (वय ३१ ,रा. आव्हाळवाडी, मूळ रा. नांदेड) असे गुन्हा दाखल केलेल्या या बसचालकाचे नाव आहे. नगर रस्त्यावरील केसनंद फाट्याजवळ झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेला पादचारी कचरावेचक आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा, भंगार माल वेचण्याचे काम तो करायचा. खासगी बसने धडक दिल्याने कचरावेचकाचा मृत्यू झाला. पोलिसांना अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.ॉ

mumbai best bus accident
Best Bus Accident: कुर्ल्यानंतर पुन्हा बेस्ट बसचा अपघात; सीएसएमटी परिसरात बसखाली आल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Kurla Bus Accident
Kurla Bus Accident : पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस, अन् घात झाला…; घरी परतताना १९ वर्षीय तरूणीला मृत्यूने गाठलं
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
Mumbai Bus Accident
Mumbai Bus Accident : मुंबईत बेस्टच्या बसची अनेकांना धडक, ३ ठार, १७ गंभीर जखमी
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
badlapur accident latest news in marathi
बेदरकार ट्रकने चिरडल्याने एकाचा मृत्यू; बदलापूर येथील घटना, चालक ताब्यात

हेही वाचा : पुणे महापालिकेतील समाविष्ट गावांतील रहिवाशांना दिलासा; मालमत्ता करात ४० टक्के सवलतीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत

दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री वाघोली ते राहू रस्त्यावर भरधाव दुचाकीस्वाराने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. सचिन राजेंद्र जगताप (वय ३०, रा. देवकरवाडी, दौंड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार मयूर कृष्णा जाधव (वय ४२, रा. कुंजीर वस्ती, मांजरी बुद्रुक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader