पुणे : मुंबई जुन्या महामार्गावर सोमाटणे फाटा येथे कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर कारचालक जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. अर्जुन शेळके आणि भालचंद्र अहिरकर असं अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही पिंपरी- चिंचवडमधील यमुना नगर येथील रहिवाशी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- मुंबई जुन्या महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमध्ये कार चालक देखील किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाल्याने यात वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. अपघाताची तीव्रता वाहनांकडे बघितल्यानंतर कळते. मृत्यू झालेले दोघेही दुचाकीवरून तळेगावच्या दिशेने जात होते. तेव्हा, कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.