पिंपरी : चिंचवडमध्ये मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगमधील वीस दुचाकी जळून खाक झाल्या. यात स्थानिक रहिवाशांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पिंपरी- चिंचवडमधील विठ्ठल नगर वसाहत बिल्डिंग नंबर ५ या ठिकाणी ही घटना घडली आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही. पिंपरी- चिंचवड शहरातील विठ्ठल नगर या भागात बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या २० दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. ही घटना मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : नाताळानिमित्त लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या काय होणार…

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले, अवघ्या १५ ते २० मिनिटांत अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या घटनेत स्थानिक रहिवाशांच्या २० दुचाकी वाहने जळून खाक झाल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. अद्याप आग लावली गेली का? की, आग लागण्याचे इतर कारण आहे, हे समजू शकलेले नाही.