पुणे : अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी तरुणाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नरवडे यांनी यांनी सहा महिने सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागेल, तसेच दंडातील रकमेपैकी १० हजार रुपये मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

विनोद उर्फ विनायक सुरेश चव्हाण (वय २०, रा. जनता वसाहत, जनवाडी, गोखलेनगर) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. २२ ऑक्टोबर २०११ रोजी सकाळी अल्पवयीन मुलगी शाळेत कार्यक्रम आहे, असे असे सांगून घराबाहेर पडली. रात्री उशीरापर्यंत ती घरी परतली नाही. पालकांनी शाळेत जाऊन चौकशी केली. तेव्हा शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पालकांच्या मोबाइल क्रमांकावर मुलीने संपर्क साधला. ‘मी नाशिकला आहे. चार दिवसांनी परत येईल’, असे तिने सांगितले. पालकांनी पुन्हा मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल बंद असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
Four people from Dombivli arrested, Kalyan girl selling,
कल्याणमध्ये दीड महिन्याच्या बालिकेची विक्री करणाऱ्या डोंबिवलीतील चार जणांना अटक
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ
Baglan, Igatpuri, Dindori, Kalwan, cost sensitive constituencies,
गुजरातशी संलग्न बागलाण, इगतपुरी, कळवण, दिंडोरी खर्चविषयक संवेदनशील मतदारसंघ
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार

हेही वाचा : पुणे: अ‍ॅपचा वापर करून वर्गातील मुलींची अश्लील छायाचित्रे, तीन अल्पवयीन ताब्यात

पोलिसांनी चव्हाणला अटक केली. चौकशीत चव्हाणने मुलीला विवाहाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे उघड झाले. पोेलिसांनी चव्हाणविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील संजय पवार यांनी चार साक्षीदारांची साक्ष नोंदविली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने चव्हाणला शिक्षा सुनावली.