पुणे : मोबाइल विक्री करणाऱ्या दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ५३ लाख रुपयांचे २०० मोबाइल संच चोरून नेल्याची घटना कोथरुडमधील डहाणूकर काॅलनी परिसरात घडली. याबाबत गौरव शिंदे (वय ३१, रा. वारजे) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौरव यांचे डहाणूकर काॅलनीत मोबाइल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी मोबाइल विक्री दुकानाचा दरवाजा मध्यरात्री उचकटून २०० मोबाइल संच चोरून नेले.
हेही वाचा : पुणे भाजपवर घराणेशाहीचा पगडा, जुनेजाणते घरी
चोरीला गेलेल्या मोबाइलची किंमत ५३ लाख रुपये असल्याचे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास करत आहेत.