पुणे : विमाननगर येथील फिनिक्स माॅलच्या इमारतीतील सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला तरुण खासगी वित्तीय संस्थेत कामाला होता. रिचर्ड एबल झकेरिया (वय २५, रा. फुलेनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी फिनिक्स माॅलच्या वाहनतळाच्या आवराात सातव्या मजल्यावरुन पडून एक तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पोलिसांनी मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटविली.

हेही वाचा : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध आणि तरुणी गर्भवती होताच…

रिचर्ड विमाननगर भागातील एका खासगी वित्तीय संस्थेत कामाला होता. शुक्रवारी सकाळी तो कामावर आला होता. तो फिनिक्स माॅलमध्ये सायंकाळी गेला. तो सातव्या मजल्यावरुन नेमका कसा पडला, याबाबतची माहिती मिळाली नाही. रिचर्डच्या मागे आई-वडील असा परिवार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.