पुणे : भरधाव दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बालेवाडी परिसरात घडली. रणजीत भास्कर रोकडे (वय २९, रा. शिवराज बिल्डींग, वृंदावन काॅलनी, कोथरुड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई मनोज दिवे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार रणजीत हे रविवारी पहाटे तीनच्या सुमारास बालेवाडी परिसरातून निघाले होते. मिटकाॅन स्कूलसमोर नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : आरटीआय कायद्याची महाराष्ट्रात दुर्दशा; सर्वाधिक अपिले, तक्रारी प्रलंबित

रणजीत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रणजीत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.