पिंपरी : मराठी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरुन मोबाइल क्रमांक घेवून लग्नाचे आमिष दाखवत लॉजवर नेऊन बलात्कार केला. नंतर तिचा बळजबरीने गर्भपात करून लग्नास नकार देत शारिरीक संबंध करतानाचा ‘व्हिडीओ व्हायरल’ करण्याची धमकी दिली. हा प्रकार ताथवडेमध्ये उघडकीस आला. याप्रकरणी २९ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरुन वाकड पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आकाश शंकर जगदाळे (वय ३२, रा. जिजामाता चौक, कडोळकर कॉलनी, तळेदाव दाभाडे) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची मराठी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरुन प्रोफाइल पाहून त्यावरुन आरोपीने मोबाइल क्रमांक घेतला. तरुणीशी ओळख वाढविली. तिला लग्नाचे आमिष दाखविले. लॉजवर, मोटारीत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गर्भधारणा झाल्यानंतर आरोपीने ‘तू गर्भपात केला तरच मी तुझ्याशी लग्न करेन, अन्यथा मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही’ अशी धमकी दिली.
हेही वाचा : मी अजितदादा विरोधात कधीच भूमिका मांडणार नाही – सुप्रिया सुळे
पीडितेला तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर लग्नास नकार देत आरोपीने शिवीगाळ केली. मोबाइलमधील शारीरीक संबंध करतानाचा व्हिडीओ पीडितेला दाखविला. ‘मी आपले शारिरीक संबंध करतानाचे व्हिडीओ माझ्या मोबाइलमध्ये काढले आहेत, तू जर मला त्रास दिला तर मी तुझे व्हिडीओ व्हायरल करेन’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार गाडे तपास करत आहेत.