पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील तीन गुंडांना तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिले. सागर श्रावण पवार-पाटोळे (वय २८, वारजे), प्रथम उर्फ मनोज विनोद ससाणे (वय २०, रा भवानी पेठ), गणेश अरुण गायकवाड (वय २४, रा. शंकरमहाराज वसाहत, धनकवडी) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्वारगेट आणि सहकारनगर पोलिसांनी तिघांना शहरातून तडीपार करण्याचा प्रस्ताव परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर पोलीस उपायुक्त पाटील यांनी तिघांना पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले.