पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीतील रहिवासी आहे. तरुण आणि त्याची पत्नी मजुरी करतात. ते फिरस्ते आहेत. तरुणाची पत्नी आजारी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : शेतजमीन मोजणीसाठी लाच मागणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकासह दोघे अटकेत

तरुण आणि त्याची पत्नी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील आरक्षण केंद्र परिसरात थांबले होते. त्यांच्याबरोबर तीन वर्षांचे बालक होते. पत्नीला घेऊन तरुणाला दवाखान्यात जायचे होते. आरक्षण केंद्र परिसरातून तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण करण्यात आले, असे तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाले तपास करत आहेत.