पुणे : पुण्यातील घरांच्या बाजारपेठेमध्ये मागील वर्षात मोठी वाढ नोंदविण्यात आली. सरलेल्या २०२३ मध्ये ४९ हजार २६६ घरांची विक्री झाली आहे. कार्यालयीन जागांच्या मागणीतही मागील वर्षी मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. एकूण ६७ लाख चौरस फुटांच्या कार्यालयीन जागांचे व्यवहार झाले आहेत. ‘नाइट फ्रँक इंडिया’ने पुण्यातील मालमत्ता क्षेत्राचा २०२३ चा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, पुण्यातील घरांच्या बाजारपेठेने २०१३ पासूनची चांगली कामगिरी २०२३ मध्ये नोंदविली. मागील वर्षी एकूण ४९ हजार २६६ घरांची विक्री झाली. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात १३.३ टक्के वाढ नोंदविण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा विचार करता स्थलांतरित नोकरदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. व्याजदर जास्त असूनही मागील वर्षी घरांची मागणी कायम राहिल्याचे दिसून आले आहे. नवीन गृहप्रकल्प सुरू होण्याचे प्रमाण वाढले असून, मागील वर्षी एकूण ४२ हजार ४३७ घरांचा पुरवठा झाला. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात १० टक्के वाढ झाली आहे. घरांच्या किमतीचा विचार करता ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या घरांना सर्वाधिक ४६ टक्के मागणी दिसून आली. याचवेळी ५० लाख रुपयांखालील घरांना ३८ टक्के मागणी दिसून आली. तसेच, १ कोटी रुपयांवरील घरांच्या मागणीतही वाढ झालेली दिसून आली असून, ती १५ टक्क्यांवर पोहोचली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राचे मॉडेल नेणार देशपातळीवर, पुढील वर्षीपासून सात नवे अभ्यासक्रम

आयटीमुळे कार्यालयीन जागांना मागणी

माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांकडून मागील वर्षी पुण्यात कार्यालयीन जागांना मागणी जास्त दिसून आली. सरलेल्या वर्षात कार्यालयीन जागांचे एकूण ६७ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले. मेट्रो मार्गांच्या विस्तारासह इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे पुढील काळात ही मागणी आणखी वाढेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : बार्टीने निर्णय फिरवला…१० जानेवारीला सीईटी होणार!

घरांच्या किमतीत ८ टक्के वाढ

‘गेरा डेव्हलपमेंट्स’ने पुण्यातील निवासी मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, मागील वर्षी जून ते डिसेंबर या कालावधीत घरांच्या सरासरी किमतीने ५ हजार ९३८ रुपये प्रति चौरस फूट हा नवा उच्चांक गाठला. याआधी किमतीने डिसेंबर २०१५ मध्ये ५ हजार ९६ रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यापेक्षा मागील सहामाहीत घरांच्या किमतीत झालेली वाढ १७ टक्के जास्त आहे. मागील वर्षभरात घरांच्या किमती ८. ७४ टक्क्याने वाढल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune 49 thousand 266 houses sold in year 2023 pune print news stj 05 css
Show comments