बदलापूर येथील चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. या घटनेनंतर राज्यातील अनेक भागातील महिला आणि लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येताना दिसत आहे. दरम्यान बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील खडकवासला परिसरातील एका शाळेत ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रमाद्वारे विद्यार्थींनींना माहिती दिली जात होती, मुलींना सजग करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान एका दहा वर्षीय मुलीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराला वाचा फोडली. ६८ वर्षाच्या नराधमांने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले. यामुळे खडकवासला परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा… Maharashtra News Live : “एका घटकाला काढून टाकायचं का? अशी महायुतीत चर्चा”, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

Crime News
नराधमाने ओलांडल्या क्रूरतेच्या सीमा, पोटच्या मुलांदेखत महिलेवर बलात्कार; पती घरी येताच अ‍ॅसिड…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
IT girl murder, rape case, Mumbai,
विश्लेषण : मुंबईत आयटी तरुणी हत्या, बलात्कार प्रकरणात तपासातील त्रुटींमुळे आरोपी निर्दोष… नेमके प्रकरण काय होते?
Kerala Double Murder
जादूटोण्याच्या संशयातून पाच वर्षांत संपूर्ण कुटुंब संपवलं; जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीचं कृत्य
juvenile assault with knife in Mumbai news in marathi
जाड्या चिडवल्याने मित्रावर चाकूने हल्ला; दोन अल्पवयीन मुलांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
right to privacy is guaranteed under Article 21 of the Constitution
आरोपींनाही गोपनीयतेचा मूलभूत अधिकार आहेच!
Mamata Banerjees
Mamata Banerjee : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला जन्मठेप; ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी समाधानी नाही”
kolkata-rape-murder-case-aparajita-bill-
कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पालकांनी नाकारली सरकारकडून नुकसान भरपाई! नेमकं कारण काय?

दिलीप नामदेव मते या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला परिसरातील १० वर्षाची पीडित मुलगी शुक्रवारी ११ वाजण्याच्या सुमारास शाळेत जात होती. त्यावेळी आरोपी दिलीप मते याने तिला खाऊसाठी पैसे देतो असे आमिष दाखवून जवळच्या एका खोलीत नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्या घटनेबाबत पीडित मुलीने घरी कोणालाही सांगितले नाही. दुसर्‍या दिवशी पीडित मुलगी शाळेत गेल्यावर शाळेमध्ये ‘गुड टच, बॅड टच’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिक्षकांनी प्रत्येक मुलीशी संवाद साधत होते. त्या दरम्यान पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितल्यावर आरोपी दिलीप मते याच्या विरोधात हवेली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास हवेली पोलिस करत आहेत.

Story img Loader