पुणे : भरधाव ट्रकने मालवाहतूक करणारे वाहन आणि रिक्षाला रविवारी रात्री कल्याण-नगर महामार्गावर धडक दिली. अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ अपघात झाला. अपघातात दोन लहान मुले, एका महिलेचा समावेश आहे. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ अंजीराची बागेजवळ रविवारी रात्री आठच्या सुमारास भरधाव ट्रकने मालवाहतूक करणारे पिकअप वाहन, रिक्षाला धडक दिली. अपघातात पिकअप वाहन आणि रिक्षातील आठ जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक सचिन कांडगे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : हंगामाच्या सुरुवातीलाच तांदूळ १५ ते २० टक्के महाग; पावसाची ओढ, अवकाळीचा उत्पादनावर परिणाम

अपघातातील गंभीर जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी क्रेनच्या सहायाने बाजूला काढली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आठ जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक कांडगे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune 8 died in truck and pick up vehicle accident on nagar kalyan highway near junnar at dingore village pune print news rbk 25 css