पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा परिसरात एका इमारतीतील कार्यालयात आग लागली. आगीत कार्यालयातील संगणक, विद्युत उपकरणे, तसेच अन्य साहित्य जळाले. कार्यालय बंद असल्याने गंभीर दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पंधरा ते वीस मिनिटांत आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा…पुणे : पोलीस भरतीला आला आणि पाच वर्षांसाठी तुरुंगात गेला

धायरी फाटा परिसरात तीन मजली ओम पॅलेस ही इमारत आहे. इमारतीत पहिल्या मजल्यावर सृष्टी डिझायनर या कंपनीचे कार्यालय आहे. कार्यालयात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या सिंहगड रस्ता केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्यालय बंद असल्याने जवानांनी रहिवाशांकडून चावी घेतली. कार्यालयात कोणी अडकले नसल्याची खात्री जवानांनी केली. त्यानंतर जवान नरेश पांगारे, निलेश पोकळे, अजित शिंदे, विक्रम मच्छिंद्र, दिग्विजय नलावडे यांनी पाण्याचा मारा करून पंधरा ते वीस मिनिटांत जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीत संगणक, प्रिंटर, लाकडी सामान, विद्युत उपकरणे, तसेच अन्य साहित्य जळाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता जवानांनी व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune a fire broke out in a private office near dhayari phata area on sinhagad road pune print news rbk 25 psg
Show comments